पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका उपलब्ध होत असलेल्या लसीच्या पुरवठ्यानुसार लसीकरण मोहिम राबवत आहे. शहरात उद्या (शनिवार दि.१५) रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते सायं. ५ या कालावधीत देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना १५ मे २०२१ पासून ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान (८४ ते ११२ दिवस) देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उद्या दि.१५/०५/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
खालील ८ केंद्रांवर लसीकरण होणार..
१) यमुनानगर रुग्णालय, २) तालेरा रुग्णालय, ३) सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, ४) नवीन जिजामाता रुग्णालय, ५) आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ, ६) खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, ७) नवीन आकुर्डी रुग्णालय, ८) आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ
तसेच शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या दि.१५/०५/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. तरी वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व सहकार्य करावे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान आज (दि.१४) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर एकूण १८८५ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.