पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर उद्या (मंगळवार दि.०१ जून) रोजी ‘कोव्हॅक्सिन’ व ‘कोविशिल्ड’ लस वय वर्षे ४५ पुढील ज्या नागरिकांना देण्यात येणार आहे.
त्यानुसार ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उद्या दि.०१ जून रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि.०१ जून रोजी ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने उद्या दि.०१/०६/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३३ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येणार आहे.
‘कोव्हॅक्सिन’ लसीचे डोस या तीन केंद्रावर मिळणार
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड (तालेरा रुग्णालय), सावित्रीबाई फुले शाळा, जुने भोसरी रुग्णालया जवळ, नवीन जिजामाता रुग्णालय
‘कोविशिल्ड’ लसीचे डोस खालील ३३ केंद्रावर मिळणार
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर चिंचवड, कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल आकुर्डी, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, रोटरी क्लब सेंटर संभाजीनगर (दिव्यांग नागरिकांकरिता), घरकुल दवाखाना चिखली, यमुनानगर रुग्णालय, रुपीनगर शाळा, तळवडे समाज मंदीर शाळा, प्राथमिक शाळा – ९२ मोरे वस्ती-म्हेञे वस्ती, पिं. चिं. मनपा. शाळा खराळवाडी, आचार्य अत्रे सभागृह वायसीएम रुग्णालयाजवळ, नेहरुनगर उर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय,पिं. चिं. मनपा.शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कुल मोशी दवाखाना, छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी (सी एस एम),
पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, कासारवाडी दवाखाना, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा मंगलनगर थेरगाव-३३,पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा पिं. निलख दवाखानाजवळ, पिं.चिं.मनपा. शाळा पवनानगर काळेवाडी, भाटनगर दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, फकीर भाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड स्टेशन, मनपा शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल पुनावळे, प्रेमलोक पार्क दवाखाना, मनपा शाळा वाल्हेकरवाडी.
तसेच उद्या दि.०१ जून रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.