पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात उद्या सोमवार दि.०७ जून २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ६४ लसीकरण केंद्रांवर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १० ते सायं. ५ या कालावधीत मिळणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि.०७ जून २०२१ रोजी ज्या लाभार्थ्यांना पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यंत) देण्यात येणार आहे.
तसेच उद्या दि.०७ जून २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे. सोबत लसीकरण केद्रांची यादी जोडली आहे.
‘या’ ६४ केंद्रांवर कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस मिळणार
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल आकुर्डी, हेगडेवार जलतरण तलाव (पॅनअर्थो रुग्णालयासमोर), संजय काळे सभागृह, इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर चिंचवड, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, रोटरी क्लब सेंटर, संभाजीनगर (दिव्यांग नागरिकांकरिता), आर.टी.टी.सी सेंटर, पिं. चिं. मनपा. कन्या शाळा चिखली, घरकुल दवाखाना चिखली, पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्रांऊड सेक्टर नं.२१ यमुनानगरतळवडे समाज मंदीर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजाताजा पार्क फुलेनगर, प्राथमिक शाळा – ९२ मोरे वस्ती म्हेञे वस्ती, पिं. चिं. मनपा. शाळा खराळवाडी,
आचार्य अत्रे सभागृह, वाय.सी.एम रुग्णालयाजवळ नेहरुनगर उर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, एस.एस.अजमेरा स्कुल अजमेरा, दिनदयाल शाळा पवना बॅक मागे संत तुकाराम नगर पिंपरी, क्वालिटी सर्कल भोसरी, समता स्कुल चक्रपाणी वसाहत भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रयनी नगर भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कुल भोसरी, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कुल मोशी दवाखाना, छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी (सी एस एम), गंगोञी पार्क दिघी, बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केट बॉल ग्राऊड स्पाईन रोड मोशी,
पिंपळे गुरव माध्यमीक शाळा, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शंकुतला शितोळे शाळा वेताळ महाराज सोसायटी जुनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, बालाजी लॉन्स नदी शेजारी जुनी सांगवी, खिवंसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा पिं. निलख दवाखानाजवळ, पिं. चिं. मनपा शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा कस्पटे वस्ती वाकड, पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा ग प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा मंगलनगर थेरगाव-३३, पिं. चिं. मनपा. शाळा पवनानगर काळेवाडी,
अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, नवीन जिजामाता रुग्णालय, फकीर भाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड स्टेशन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड पुणे, मनपा शाळा किवळे, मानसरोवर गुरुव्दारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल पुनावळे, कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, सेक्टर नं.२९ मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडीकल फाऊंडेशन मोरया हॉस्पीटल चिंचवड, प्रेमलोक पार्क दवाखाना, मनपा शाळा वाल्हेकरवाडी.