पिंपरी (Pclive7.com):- राज्यात सर्वत्र कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू आहे. मात्र लसींचा मोठा तुटवडा असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच शिवसेना नगरसेविका मिनल विशाल यादव यांनी मोहननगर, काळभोरनगर, ऐश्वर्य, रामनगर परिसरातील नागरिकांसाठी लसीकरण शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी २५१ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
कोरोनाच्या महामारीपासून मुक्त होण्यासाठी यावर उपाय फक्त लसीकरण आहे. त्यामुळेच नगरसेविका मिनल विशाल यादव यांच्यावतीने दि.१२ रोजी जिजामाता सांस्कृतिक भवन येथे मोफत लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मोहननगर, काळभोरनगर, ऐश्वर्य, रामनगर परिसरातील अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. ऑनलाइन पद्धतीमुळे अनेक नागरिकांना लसीकरण मिळण्यास अडथळा निर्माण होत होता. यावर उपाययोजना म्हणून नगरसेविका मिनल यादव यांनी थेट पध्दतीने लसीकरण आयाेजित केले होते.
या कार्यक्रमाच्या वेळी पिंपरी शहर संघटक विशाल यादव, शाखाप्रमुख नागेश नामदे, शशिकांत पाडाळे, स्वप्नील येवले, प्रदीप बाबर, रोहित खजिनदार, सुमीत धुमाळ, आकाश राजिवले, सचिन हुले, प्रदीप बाबर, संतोष धावडे, आण्णा बाबर, काशीत काका यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी २५१ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. नगरसेविका मिनल यादव यांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.