पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील साई चौक येथील सलोनी बार हा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवून तिथे ग्राहकांची गर्दी झाली असून त्यामुळे कोरोना निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने रात्री साडेबाराच्या सुमारास छापा टाकला.
त्यावेळी बारमध्ये ४६ ग्राहक मिळून आले. त्यांच्यावर कारवाई करून २३ हजारांचा दंड आकारण्यात आला. पिंपरी-चिंचवड पाेलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
बारमालक राजेश कनैय्या लालवानी (वय ४८), वेटर अराफत मोजरिम मंडल (वय २४), हबीबूल माफीजूल शेख (वय १९), कुक कौसिक अनारुल मुल्ला (वय २१, सर्व रा. पिंपरी), व बारमधील ४६ ग्राहक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.