पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील साई चौक येथील ‘रियल मी’ या मोबाईल शोरूमचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ अजितदादा पवार यांच्या हस्ते (दि.२८) संपन्न झाले.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक डब्बू आसवानी, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेविका निकिता ताई कदम, माजी नगरसेवक गुरुबक्ष पेहेलानी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर पार्थ पवार यांनी संपूर्ण शोरूमची पाहणी केली. आजच्या तरूणांचा कल हा नवनवीन तंत्रनानाकडे असतो. मोबाईलच्या नवीन मॉडेलमध्ये कोणते विशेष फिचर आहेत, त्याकडे तरूणाईचे बारिक लक्ष असते. त्यामुळे तरूणांना केंद्रबिंदू ठेवून मोबाईल कंपनी बाजारात उतरत असल्याचे पार्थ पवार यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी या नवीन शोरूमला खूप खूप शुभेच्छा दिल्या. दरम्यान पिंपरीतील प्रमुख व्यापाऱ्यांनी पार्थ यांची भेट घेऊन, सर्व व्यापारी वर्गाच्या समस्या मांडल्या. त्यावर लवकरच पिंपरीतील व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊ असे आश्वासन पार्थ पवार यांनी दिले.

























Join Our Whatsapp Group