पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने विजय दशरथ चौधरी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र भाजप कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. विजय हरगुडे यांनी दिले आहे.

विजय चौधरी यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून विभागातील भाजप कामगार मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करतील, तसेच संघटित व असंघटित कामगारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका घेतील, अशी अपेक्षा अध्यक्ष ॲड. विजय हरगुडे यांनी व्यक्त केली आहे.

कामगारांच्या समस्या सोडवणे, त्यांना पक्षाशी जोडणे आणि जास्तीत जास्त श्रमिकांना भाजपमध्ये सामील करून घेणे यासाठी विजय चौधरी प्रभावीपणे काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल विजय चौधरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






















Join Our Whatsapp Group