पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे. काँग्रेसने थेट अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला आमच्यासोबत आघाडी करा, असा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात काँग्रेसने २० जागांची मागणी केली आहे. आता अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागा देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काँग्रेसच्या निवडणूक समितीचे सदस्य मनोज कांबळे या मागणीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याकडे सुपूर्त केला आहे. काँग्रेसच्या या प्रस्तावाचं अजितदादांच्या राष्ट्रवादीने स्वागत केलं आहे. पण अजित पवार याबाबत निर्णय घेतील आणि आता आम्ही अजित पवारांशी आज किंवा उद्या चर्चा करु, असं बहल म्हणाले आहेत.

दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवारांकडे दोन दिवसांपूर्वी प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यात महाविकास आघाडीसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यावं अशी मागणी होती. परंतू आता काँग्रेसने हा स्वतंत्र प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे अजित पवार याबद्दल काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.






















Join Our Whatsapp Group