पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही सरळ लढत होणार हे स्पष्ट झाल्यानंतर शहरात प्रचंड राजकीय उलथापालत होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वपूर्ण मानले जाणारे नेते राहुल कलाटे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत.

दरम्यान राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संपर्क साधला जात असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच राहुल कलाटे भाजपमध्येही जाणार अशी चर्चा देखील सुरू आहे. परंतु राहुल कलाटे यांनी मात्र सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

त्यांच्या पुढील भूमिकेबाबत बोलताना राहुल कलाटे म्हणाले की, सध्या माझं पूर्ण लक्ष माझा प्रभाग आणि परिसराकडे आहे. मी पूर्वी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढलो आहे. खूप जीवाभावाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, या सर्वांशी मी चर्चा करत आहे. सध्याची जी परिस्थिती आहे, माझा जो प्रभाग आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून चर्चा करून निर्णय घेणार आहे. परंतु जी काही परिस्थिती सुरू आहे त्याला अनुसरूनच निर्णय घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात पुढील निर्णय घेणार असल्याचे राहुल कलाटे यांनी म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group