चिंचवड (Pclive7.com):- बहुप्रतिक्षित पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच, सर्वत्र राजकीय वातावरण तापले आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या घोषणेमुळे आता सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे. दरम्यान, भाजपच्या बालेकिल्ल्यात चिंचवड मतदारसंघातील प्रभाग २६ मध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.

पिंपळे निलख, वाकड आणि कस्पटे वस्तीचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक २६ मध्ये यंदा उमेदवारीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. भाजपचे अनेक निष्ठावान आणि इच्छुक कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तर दुसरीकडे काही विद्यमान आपली उमेदवारी कायम राहावी यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये जाहीर झालेल्या अंतिम आरक्षण सोडतीनुसार, प्रभाग क्रमांक २६ मध्ये अनुसूचित जाती (SC राखीव), मागासवर्ग प्रवर्ग (OBC – महिला), सर्वसाधारण (खुला), आणि सर्वसाधारण महिला अशा चार जागा निश्चित झाल्या आहेत. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांना त्यांच्या राजकीय योजनांमध्ये बदल करावे लागले आहेत.

जनसंपर्कच मुद्दा महत्वाचा..
भाजपाकडून इच्छुक असणाऱ्या सर्वच उमेदवारांनी विविध उपक्रम, कार्यक्रम घेत लोकांशी जनसंपर्क वाढविण्यास सुरूवात केली असताना आता आचारसंहिता लागू झाल्याने नियोजनबद्ध प्रचाराची रणनीती आखून काम करण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत पाहिलं तर भाजपकडून उमेदवारी मिळवू पाहणाऱ्या इच्छुकांच्या गर्दीत स्नेहा कलाटे यांच्या प्रचारपद्धतीने आणि वाढत्या जनसंपर्काने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. त्यांचा प्रचार आणि संपर्क साधण्याची पद्धत सध्या प्रतिस्पर्धकांसाठी डोकेदुखी ठरताना दिसते आहे. ‘रणजित आबा कलाटे फाउंडेशन’च्या माध्यमातून जनहित साधणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून कलाटेंनी थेट नागरिकांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. याशिवाय उच्च शिक्षण घेतलेल्या स्नेहा कलाटे यांनी कोणत्याही राजकीय पदाशिवाय प्रभागात केलेली जनतेशी थेट संवाद, विकास कामांसाठी पाठपुरावा, जेष्ठ नागरिक व महिलांसाठी आयोजित केलेले विविध सामाजिक उपक्रम, सोशल मीडियाचा प्रभावी वापर यामुळे भाजपाकडून इच्छुक असणाऱ्या स्नेहा कलाटे यांचे पारडे आता जड असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे इत्तर महिला इच्छुक उमेदवार उमेदवारी जाहीर होण्याची वाट पाहत असताना कलाटे यांनी चालू केलेला घर टु घर प्रचार आणि त्याला मिळणार प्रतिसाद पाहून विरोधकही चक्रावले आहेत.
आमदार शंकर जगताप व शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या भूमिकेकडे लक्ष..
एकंदरीत प्रभाग २६ मध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठीची ही चुरस आगामी काळात आणखी तीव्र होताना दिसेल. आमदार जगताप व भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे विद्यमान माजी नगरसेवक संदीप कस्पटे, आरती चोंधे व नव्याने दाखल झालेले सचिन साठे यांच्या परिवारात संधी देणार की काही दशकांपासून निकटवर्तीय असणाऱ्या, भाजपचा झेंडा घेऊन कार्य करणाऱ्या जनसंपर्क असणाऱ्या, राष्ट्रसेविका समितीच्या सदस्या असणाऱ्या कलाटे कुटुंबातील प्रबळ दावेदार स्नेहा कलाटे यांना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार जगताप आणि शहराध्यक्ष काटे यांनी मागील काळात सर्वच उमेदवारांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. कोणाची हि उमेदवारी न जाहीर करता भाजपाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहा अशी सावध भूमिका देखील या दोन्ही नेत्यांनी घेतली होती.
























Join Our Whatsapp Group