आवाज मित्र मंडळ ट्रस्टच्या सदस्यांनी मानले सुलभा उबाळे यांचे आभार
पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील सेक्टर क्रमांक २२, बिल्डिंग नं. १५, अंकुश आनंद हौसिंग सोसायटीमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येचे अखेर कायमस्वरूपी निराकरण झाले आहे. या कामासाठी आवाज मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने माजी नगरसेविका व शिवसेना नेत्या सुलभा रामभाऊ उबाळे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

सदर सोसायटीमध्ये वारंवार वीज खंडित होणे, दर चार-पाच दिवसांनी एमएसईबीची जोडणी तुटणे, तसेच नागरिकांना सतत अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत सोसायटीधारकांनी अनेक वेळा संबंधित कार्यालये व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला होता. मात्र दीर्घकाळ समाधानकारक तोडगा निघाला नव्हता.

आवाज मित्र मंडळ ट्रस्टच्या सदस्यांनी ही समस्या सुलभा उबाळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने लक्ष घालत संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून अवघ्या एका दिवसात काम पूर्ण करून घेतले. परिणामी, दीर्घकाळ प्रलंबित असलेली वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सुटली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आवाज मित्र मंडळ ट्रस्ट तसेच सर्व सोसायटीधारकांच्या वतीने सुलभा उबाळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी तत्परतेने हस्तक्षेप करून दिलासा दिल्याबद्दल सुलभा उबाळे यांचे या सर्व परिसरातून आभार व्यक्त होत आहे.
























Join Our Whatsapp Group