पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत भाजप प्रवेशा संदर्भात हालचाली सुरू केल्याची चर्चा असतानाच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र कलाटे यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. आम्ही भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असून आयात उमेदवाराला भाजपमध्ये संधी देऊ नये अशी भूमिका स्थानिक नेते भाजपा उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी घेतली आहे.

चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल कलाटे हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यातच कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.

प्रसार माध्यमांची बोलताना राम वाकडकर म्हणाले की, आम्ही २०१४ पासून याठिकाणी भाजपाचे काम करीत आहोत. राहुल कलाटे यांना पराभव डोळ्यासमोर दिसत आहे म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची धडपड सुरू आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे आयात उमेदवार नको असे राम वाकडकर यांनी म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group