पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळे निलख (Pimple Nilakh) येथे एका अज्ञात व्यक्तीने कचऱ्यात नवजात बाळाला फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे अर्भक स्त्री जातीचे असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दुर्दैवाने या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठवण्यात आला असून, या अमानवी कृत्यामागे कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस सर्व शक्यता तपासून गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
























Join Our Whatsapp Group