प्रभाग क्रमांक ११ साठी इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा यादव यांची भाजपा कार्यालयात मुलाखत
पिंपरी (Pclive7.com):- इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा दिनेश यादव यांनी भाजपाच्या पिंपरी चिंचवड कार्यालय, मोरवाडी येथे मुलाखत दिली. यावेळी भाजपाच्या ध्येयधोरणांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून तळागाळात काम करण्याचा आपला मानस असल्याचे निशा यादव यांनी व्यक्त केले.

यावेळी पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, आमदार, अमित गोरखे तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी निशा यादव यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेतली. भाजप हा अनुशासनप्रिय पक्ष असून पक्षाच्या विचारधारेशी निष्ठावान राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाला कायमच गरज असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संघटन व सामाजिक कामाची दखल..
गेल्या अनेक वर्षांपासून निशा यादव यांचे पती दिनेश यादव हे भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून सक्रियपणे कार्यरत आहेत. तसेच स्वतः निशा यादव यांचे महिलांमध्ये केलेले संघटन व सामाजिक कार्य ठळकपणे दिसून येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. त्यामुळे पक्षाला अशाच सक्रिय, कार्यक्षम आणि समाजाशी जोडलेल्या उमेदवारांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी उपस्थित व्यक्त केले.
























Join Our Whatsapp Group