पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये नॉर्थ ईस्टर्न कॅरिंग कार्पोरेशन कंपनीजवळच्या मोकळ्या जागेत पत्त्यांवर पैसे लावून बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना पोलिसांनी पकडले. ही कारवाई १४ डिसेंबर रोजी रात्री करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत उदधवराव पतंगे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राकेश संजय पाटील (३२, बिजलीनगर, चिंचवड), सतिष अर्जुन कोळी (३८, त्रिवेणीनगर, चिखली), शिवाजी राजेंद्र शेंडगे (५२, रुपीनगर, निगडी), शिवाजी संग्राम वजरकर (५०, मोरवस्ती, चिखली), ओमप्रकाश प्रभाकर जगताप (४२, रुपीनगर, निगडी), गुलाब रियाज अली (३३, दत्तनगर, निगडी), तानाजी महादेव नायकुडे (३२, रुपीनगर, निगडी), वामन राजेंद्र शेंडगे (५५, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रान्सपोर्ट नगर येथील मोकळ्या जागेत पत्याच्या पानांवर रक्कम लावून तीनपत्ती नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून रोख ७ हजार ५४० रुपये आणि पत्याची पाने असा मुद्देमाल जप्त केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
























Join Our Whatsapp Group