पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ व मैत्री महिला व्यासपीठ व राजमुद्रा ग्रुप प्रस्तुत ‘दिवाळी स्वरपहाट’ कार्यक्रम आज प्राधिकरणामध्ये उत्साहात संपन्न झाला.

पिंपरी-चिंचवड मध्ये प्रथमच सर्वच कलाकार एका मंचावर उपस्थित होते. यामध्ये जावेद अली, साधना सरगम, विश्वजित बोरवणकर, प्रिया बर्वे, श्रेया बुगडे हे कलाकार उपस्थित होते.
या कार्यक्रमात या कलाकारांनी नागरिकांची मने जिंकली. जवळपास पाच तास हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला १२ ते १३ हजार नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक अमित गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, अनुप मोरे, उद्योजक तुषार कलाटे, तसेच शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.





















Join Our Whatsapp Group