पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने अवैध वेश्याव्यवसाया विरोधात चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाई ९ पीडित महिलांची सुटका केली असून लॉज च मॅनेजर आणि कामगाराला अटक केली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने १३ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देहू आळंदी रोड येथील लक्ष्मी चौकात असलेल्या आदित्य लॉज वर छापा टाकला. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तेथून नऊ पिडीत महिलांची सुटका केली. त्यातील एक महिला हिला बांगलादेश मधून तस्करी करून आणले होते पोलिसांनी तिची देखील सुटका केली असून तिला मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

याप्रकरणी लॉज चालक सुदर्शन पवार राहणार मुंबई जागा मालक नाना बोराटे राहणार पुणे लॉज मॅनेजर अशोक बाबर राहणार चिखली लॉज मॅनेजर साहिल उर्फ शाहीन शिराजुल मंडल राहणार पश्चिम बंगाल, लॉज कामगार अकिबुल मुल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मॅनेजर अशोक बाबर आणि कामगार अकिबुल मुल्ला यांना अटक करण्यात आली आहे.
सन २०२६ मध्ये आतापर्यंत मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने ११ ठिकाणी कारवाया करून २८ महिलांची सुटका केली आहे. तसेच ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून अशा प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सदरची कामगिरी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास राउत, अनैतिक मानवी वाहतुक प्रति कक्षाचे महिला सहा पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे, अंमलदार सहायक पोलीस फौजदार सुनिल शिरसाट, पोलीस हवालदार भगवंता मुठे, संगिता जाधव तसेच दहशतवादविरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार निकम, पोलीस शिपाई कुटे, पाटील, भोगल यांच्या पथकाने केली आहे.



















Join Our Whatsapp Group