पिंपरी (Pclive7.com):- सांगवी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी व सेवासेतू संकल्प ट्रस्ट यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आगळावेगळा आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला.

केवळ अभिवादनापुरती जयंती साजरी न करता, या उपक्रमातून विचारांची क्रांती घडवण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी “जातीव्यवस्था निर्मूलन”, डॉ. आंबेडकरांचे लेखन व भाषणे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे “फकिरा” यांसारखी प्रेरणादायी पुस्तके नागरिकांना वाटप करण्यात आली. यामागील उद्देश “विचारांचा वारसा घराघरात पोहोचवणे” हा होता.

आजच्या पिढीने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे, या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. त्यामुळे ही जयंती केवळ औपचारिक न राहता वैचारिक जागृतीची ठरली.

हा उपक्रम केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रेरणेने तसेच आमदार शंकर जगताप, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि आरपीआयचे शहराध्यक्ष नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवक शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडला. या प्रसंगी डॉ. धम्मरत्न गायकवाड, राहुल निटनवरे, निखिल केंगले, दिलीप मोरे, तेजस सुरते, क्रांतिदीप जाधव यांच्यासह युवक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group