पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत धक्कादायक प्रकार समोर आला असून, इमारतीतील टॉयलेटमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या शासकीय ठिकाणी असा प्रकार घडल्याने महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा तपासणी, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असूनही या बाटल्या इमारतीत कशा पोहोचल्या, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सुरक्षा यंत्रणेचे दुर्लक्ष झाले की जाणीवपूर्वक काणाडोळा करण्यात आला, याची चर्चा रंगू लागली आहे.

या घटनेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिस्तीवर तसेच प्रशासकीय देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आता महापालिका आयुक्त या घटनेची दखल घेऊन कोणती ठोस पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

३१ मार्चला महापालिकेत दारू आणि मटन पार्टी..
५२ कोटींच्या उपसूचना प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघरे यांनी देखील एक खळबळजनक आरोप केला होता. हा भ्रष्टाचाराचा गैरप्रकार पूर्ण होताच महापालिकेत ३१ मार्च रोजी रात्री दारू आणि मटन पार्टी झाली होती असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. आता महापालिकेत दारूची बाटलीच आढळल्यामुळे संदीप वाघेरे यांनी केलेल्या आरोपांना बळ मिळाले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.





















Join Our Whatsapp Group