पिंपरी (Pclive7.com):- पार्थदादा पवार व विशाल शंकर वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी आयोजित सक्षम उद्योगिनी, (कला कौशल्य विकास कार्यक्रम) उद्योग प्रशिक्षण शिबीर व सन्मान सोहळा द्रौपदा लॉन्स, हिंजवडी रोड वाकड येथे संपन्न झाला.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये वाकड परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन, केक आणि आईस्क्रीम बनविण्याचे कौशल्य आत्मसात केले. महिलांना घरबसल्या छोटे मोठे व्यवसाय करून सन्मानाने आपली उपजीविका भागविता यावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे
भरारी फौंडेशनच्या माध्यमातून हे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. तसेच वाकड परिसरातील ज्या महिला बचत गटाच्या माध्यमातून पुढे येऊ पाहत आहेत अशा कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले. यानंतर पुढेही महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायासाठी प्रशिक्षण देणे सुरूच राहणार आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आयोजकांचे प्रयत्न राहणार आहेत.