पिंपरी (Pclive7.com):- डुडूळगाव येथील सावतामाळी नगर मधील रस्त्यावर सांडपाणी येत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
डुडूळगाव येथील सावतामाळी नगर येथे स्प्लेंडीड पार्क सोसायटीतील लेबर कॅम्प मधून वाहणारे सांडपाणी राजपर्व सोसायटी गट नंबर 121 समोरून गेले आठ दिवस रस्त्यावरती वाहत असून अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
अनेक दिवसांपासून येथील रहिवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जर ताबडतोब नाले गटारे सफाई केली नाही तर येथील सोसायटीतील रहिवाशांनी व ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.
महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी व सोसायटीतील रहिवाशांनी केलेला आहे. तरी महापालिका प्रशासनाने ताबडतोब याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील सोसायटीतील रहिवासी व ग्रामस्थांनी केली आहे.