पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेशदादा लांडगे युवा मंच चिखली यांच्या वतीने कुदळवाडी परिसरात ‘पोस्ट ऑफिस आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाला नागरिकांनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव हे वारंवार नाविन्यपूर्ण व लोकहितवादी उपक्रम राबविण्यासाठी कुदळवाडी भागात प्रसिद्ध आहेत.
या उपक्रमात अपघात विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, मोफत बाल आधार, पोस्टाचे मोफत बॅंक खाते, आधार मोबाईल लिंकीग ह्या योजना राबविण्यात येत आहेत.
कार्यक्रमाचे ठिकाण कुदळवाडी श्री विठ्ठल मंदिर जवळ शिवसाई पतसंस्था येथे आहे. हा उपक्रम दि.२२ व २३जुलै, वेळ सकाळी १० ते ५ या वेळेत संपन्न होणार आहे, तरी या उपक्रमाला चिखली, कुदळवाडी परिसरातील जास्ती जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन दिनेश यादव यांनी केले आहे.