पिंपरी (प्रतिनिधी):- केंद्र आणि राज्य सरकारला तीन वर्षे पुर्ण झालेत. मात्र, या तीन वर्षात महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गँस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, रिंगरोडचा प्रश्न प्रलंबित आहे. भाजप सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली उद्या शनिवार दि.०७ रोजी ‘जन हाहाकार’ आंदोलन करण्यात येणार अाहे अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी आमदार विलास लांडे, जेष्ठनेते हनुमंत गावडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मंगला कदम, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवा अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजोग वाघेरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महागाई भ्रष्टाचाराचे मुख्य मुद्दे उपस्थित केले. अच्छे दिनाचे वादे करून, बहुत हुई महंगाईकि मार, आपकी बार भाजप सरकार.. अशा लोभस घोषणा दिल्या होत्या. देशाचे पंतप्रधान, भा
जीएसटी, नोटबंदी फसली आहे. देशाचा विकास दर घटला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. शेतक-यांची फसवी कर्जमाफी, शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही. महिला, युवती सुरक्षित नाहीत. अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भ्रष्टाचारामध्ये वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, रिं