लोणावळा (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराला नव्याने बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची सोमवारी चोरी झाली होती. या प्रकारामुळे लाखों भाविकांच्या भावना दुखावल्या असून लवकरच स्वतः मंदीरावरील कळस बसविणार असल्याचे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीर केले.
सोमवारी रात्री कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराला नव्याने बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची सोमवारी चोरी झाली होती. हा सर्वप्रकार प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे झाला असुन त्या निषेधार्थ स्थानिक गावकरी आणि दुकानदार हे आपला राग व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. परंतु त्या ठिकाणी कोणताही चुकीचा प्रकार घडु नये यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी गावकर्यांना शांत करून कायदा व सुव्यवस्था हातात न घेण्याचे आवाहन केले आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे केली असुन लवकरच स्वतः मंदीरावरील कळस बसवण्याचे जाहीर केले असुन तेथील तणावाचे वातावरण शांत केले.
यावेळी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजु खांडभोर, युवासेना अनिकेत घुले, शरद हुलावळे, अंकुश देशमुख, सुरेश गायकवाड, अशोकर म्हाळस्कर, अक्षय येळवडे, बंटी शिळवणे, रुपेश येवले आदी शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.