पिंपरी (प्रतिनिधी):- सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि असोसिएशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मोलाचा सहभाग नोंदविल्याबद्दल संत तुकारामनगर येथील अशोक नागरी सहकारी बँकेचा गौरव महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा बँक्स् असोसिएशनच्या स्वारगेट येथील मुख्य कार्यालयात पार पडली. यावेळी अशोक नागरी बँकेचे संस्थापक डॉ. अशोक शिलवंत, अध्यक्ष अँड. राजरत्न शिलवंत, उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, संचालक शिलरत्न शिलवंत व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलक्षणा शिलवंत-धर यांनी हा पुरस्कार स्विकारला. अँड. सुभाष मोहिते, बँक असोसिएशन अध्यक्ष अँड. साहेबराव टकले, उपाध्यक्ष संगीता कांकरीया, मानद सचिव यांच्या उपस्थितीत व आमदार अनिल बापू भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.