पिंपरी (Pclive7.com):- गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींची माहिती संकलित केली. त्यातील ॲक्टिव्ह झालेले १० लाख १४ हजार ७०० रुपयांचे ७० स्मार्ट फोन पोलिसांनी हस्तगत केले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ व मार्च २०२४ या कालावधीत मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत तक्रारी दाखल झाल्या. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी एक पथक तयार केले. या पथकाने गहाळ मोबाईलची माहिती संकलित केली. पोलीस अंमदलार प्रवीण कांबळे तांत्रिक विश्लेषण विभागाचे अंमलदार नागेश माळी व पोपट हुलगे यांच्याकडून गहाळ झालेले जे मोबाईल कार्यान्वित झाले आहेत त्याची माहिती संकलित केली.
दरोडा विरोधी पथकाने कार्यान्वित झालेल्या मोबाइईच्या वापरकर्त्यांचे नाव व पत्ते घेऊन १० लाख १४ हजार ७०० रुपये किमतीचे ७० महागडे मोबाईल राज्याच्या विविध भागातून हस्तगत केले. हस्तगत केलेले मोबाइल हे मूळ मालकांना प्रदान करण्यात येणार आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार प्रविण कांबळे, महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रविण माने, सागर शेडगे, गणेश कोकणे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस हवालदार माळी व पोलीस शिपाई हुलगे यांनी केली आहे.
























Join Our Whatsapp Group