चाकण (Pclive7.com):- गॅस चोरीच्या घटना काही नवीन नाही. आतापर्यंत अनेकदा अशा घटना समोर आल्या आहे. परिणामी या घटनांमुळे अनेकांना चापदेखील देण्यात आला आहे. मात्र तरीही गॅस चोरी काही थांबायचं नाव घेत नाही आहे. गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय. गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झालेत. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास घडली. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे.
या गॅसच्या स्फोटात सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हा गोरखधंदा एका ढाब्याच्या समोर सुरू होता. एका कंटेनर मधून घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करणं सुरू होतं. अशात गॅसचा स्फोट झाला, तीन ते चार टाक्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या आहेत. या स्फोटाने मोठी आग लागली होती. या आगीत ढाब्यासह तिथं पार्क असणाऱ्या इतर वाहनांना ही मोठी आग लागली. तसेच स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांचे ही नुकसान झाले आहे. शेल पिंपळगावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. चाकण पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
























Join Our Whatsapp Group