पिंपरी (Pclive7.com):- देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यश साने यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुण्यात सदिच्छा भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

देहू ते आळंदी हा प्रस्तावित मेट्रो मार्ग परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासह नागरिकांना सक्षम, जलद आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनस्तरावर आवश्यक गती मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याशिवाय प्रभागातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न, नागरिकांच्या मूलभूत समस्या तसेच अनेक प्रलंबित कामांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित मागण्यांचे निवेदन सादर करून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी, “नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे हीच माझी भूमिका आहे. विकासकामांना गती देऊन नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढेही प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहणार आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक पंकज भालेकर, मार्गदर्शक विष्णू मोरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमृत अप्पा सोनवणे, प्रदीप भाऊ आहेर, दत्तात्रय भाऊ मोरे, बाळासाहेब (दादा) मोरे, रामभाऊ मोरे, देविदास भाऊ कारले आणि नवनाथ भाऊ भोसले आदी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group