३ ते ८ नोव्हेंबरदरम्यान अतिरिक्त २११ बसफेऱ्या; गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा
पिंपरी (Pclive7.com):- दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड आगाराच्या वतीने विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची होणारी गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी ३ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत एकूण ४१० बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये २११ अतिरिक्त, तर १९९ नियमित नियोजित बसफेऱ्यांचा समावेश आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील विविध गावांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे प्रवाशांना वेळेत आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी आगार व्यवस्थापनाने हे विशेष नियोजन केले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी फलाटानिहाय बसची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गर्दीचे योग्य व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत तिकीट आरक्षण सुविधांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड आगार व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group