पिंपरी (Pclive7.com):- दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक ११ मध्ये अनोखा समाजसेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळीचे औचित्य साधून कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, शरदनगर, घरकुल यासह परिसरातील हजारो कुटुंबांना पणत्यांचे वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

‘एक पणती प्रेमाची… एक ज्योत आठवणींची… एक नाव अजितदादांचे!’ या भावनिक संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. त्यांच्या कार्याच्या आठवणी कायम जिवंत राहाव्यात आणि दिवाळीच्या आनंदात प्रत्येक कुटुंबाचा सहभाग असावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

याबाबत बोलताना मारुती जाधव म्हणाले, “अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेली प्रेरणा, सर्वसामान्य माणसांप्रती असलेली आपुलकी आणि त्यांच्या आठवणी आमच्या हृदयात कायम आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हजारो घरांमध्ये पणती पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक घरात पणतीचा प्रकाश उजळताना अजितदादांच्या आठवणींची ज्योतही तेवत राहावी, हीच आमची भावना आहे.”

या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ पणत्यांचे वाटप न करता प्रेम, आपुलकी, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मारुती गणपत जाधव, सौ. कीर्ती मारुती जाधव आणि कीर्ती ताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


















Join Our Whatsapp Group