पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मंगळवारी (दि.३ नोव्हेंबर) दुपारी १:३० वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या पुढाकारातून हा सोहळा पार पडेल.

या कार्यक्रमात पोलीस मुख्यालयासाठी ताथवडे येथे मंजूर जमिनीच्या ७/१२ उताऱ्याचे हस्तांतरण केले जाणार आहे. तसेच शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्ही व इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा (खढचड) शुभारंभ होईल. पिंपरी पोलीस ठाणे, डीसीपी झोन-१ कार्यालय, अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स कार्यालय आणि २०० शासकीय निवासस्थाने असणाऱ्या पिंपरी पोलीस संकुलाचे भूमिपूजनही संपन्न होईल.

पोलीस आधुनिकीकरणांतर्गत ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे, ४ ड्रोन व ६५ नवीन वाहनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ‘नशामुक्त अभियाना’ अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाईल. या सोहळ्यास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांता पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर रवी लांडगे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.



















Join Our Whatsapp Group