पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. आज (मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर) सकाळपासूनच पोलिसांनी भापकर यांना त्यांच्या राहत्या घरीच स्थानबद्ध केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन समारंभासह पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध प्रकल्प आणि कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना त्यांच्या घरीच पोलिसांच्या देखरेखीखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्याला नजरकैदेत ठेवल्याने शहरात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.



















Join Our Whatsapp Group