पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवारी) सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कामानिमित्त तसेच नोकरी-व्यवसायासाठी सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

सकाळपासून पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शाळेत जाणारी विद्यार्थी, पालक आणि चाकरमान्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना छत्री आणि रेनकोटचा आधार घेत आपल्या कामासाठी बाहेर पडावे लागत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

















Join Our Whatsapp Group