पिंपरी (Pclive7.com):- चिखली येथील पिंगळे रोड येथे फुटपाथवर बराच वेळ उभ्या असलेल्या कारवर चिखली पोलिसांनी वाहतूक विभागाच्या मदतीने कारवाई केली. MH 20 FU 2033 क्रमांकाच्या या वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट आणि नियमबाह्य ब्लॅक फिल्मिंग असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती.

तक्रारीची दखल घेत चिखली पोलिसांनी वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई केली. तसेच वाहनावरील ब्लॅक फिल्मिंग काढून टाकण्यात आले असून, फॅन्सी नंबर प्लेटऐवजी नियमानुसार HSRP नंबर प्लेट बसविण्यात आली आहे.

ही कारवाई चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला.

















Join Our Whatsapp Group