पिंपरी (Pclive7.com):- निगडी प्राधिकरण परिसरातील गणेश तलावात मासे, साप आणि कासव मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तलावातील मोठ्या प्रमाणावरील जलचरांचा मृत्यू झाल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

तलावातील पाण्याच्या प्रदूषणामुळे हा प्रकार घडला आहे का, की अन्य काही कारणामुळे जलचरांचा मृत्यू झाला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता तपासून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याची गरज आहे.

या घटनेमुळे गणेश तलावाच्या स्वच्छतेचा आणि देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून मृत जलचरांची योग्य विल्हेवाट लावावी, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


















Join Our Whatsapp Group