अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने ‘दिवाळी पहाट’चे आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- दिवाळीच्या मंगलमय पहाटेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी निगडी प्राधिकरण येथे सुरेल संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने ‘दिवाळी पहाट २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर स्वरांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमात भावगीत आणि भक्तिगीतांची सुरेल मैफल रंगणार असून, अनुराधा पौडवाल यांच्या लोकप्रिय गीतांचा आनंद घेण्याची संधी संगीतप्रेमींना मिळणार आहे. दिवाळीच्या पहाटे भक्तिसंगीताच्या स्वरांनी वातावरण भक्तिमय करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजता नियोजित महापौर निवास मैदान, सेक्टर २७ अ, प्राधिकरण, निगडी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे, भाजप युवा मोर्चाचे मा. प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष समीर मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.

तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा संगीतमय सोहळा रंगणार आहे. दिवाळीच्या पहाटेची सुरुवात सुरेल भावगीत आणि भक्तिगीतांनी करण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या संगीत सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
















Join Our Whatsapp Group