पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण कुटुंबाच्या कपड्यांच्या खरेदीसाठी लोकप्रिय असलेल्या ‘जस्ट कॅज्युअल्स’ या ब्रँडने पिंपरी-चिंचवडमध्ये आपला विस्तार करत पिंपरी येथे नवीन स्टोअर सुरू केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इमारतीसमोरील ब्रम्हा स्काय उजुरी या इमारतीत हे स्टोअर सुरू करण्यात आले आहे.

नवीन स्टोअरचे उद्घाटन कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य लेखा छाब्रिया, सीतल अहुजा, लविना अहुजा तसेच हरिराम सी. भतिजा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या नव्या स्टोअरमुळे दर्शन अपॅरल्सच्या ‘जस्ट कॅज्युअल्स’ची पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण स्टोअर्सची संख्या १२ वर पोहोचली आहे.
यावेळी बोलताना ‘जस्ट कॅज्युअल्स’चे कुणाल अहुजा म्हणाले की, “नुकतेच ‘जस्ट कॅज्युअल्स’ने ग्राहकसेवेची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्याच वर्षात पिंपरी येथे नवीन स्टोअर सुरू होणे हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. फॅशन सर्वसामान्यांना किफायतशीर दरात आणि सहज उपलब्ध करून देण्यावर आमचा नेहमीच भर राहिला आहे.”

‘जस्ट कॅज्युअल्स’मध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांसाठी कॅज्युअल वेअर, सेमी-फॉर्मल वेअर, लाउंज वेअर आणि ॲथलीजर अशा विविध प्रकारच्या कपड्यांचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे. ग्राहकांच्या दैनंदिन वापरापासून ते विविध विशेष प्रसंगांसाठी आवश्यक असणाऱ्या फॅशनेबल आणि दर्जेदार कपड्यांचे पर्याय या स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पिंपरीतील नव्या स्टोअरमुळे परिसरातील ग्राहकांना अधिक सोयीस्कर पद्धतीने आधुनिक फॅशन आणि आकर्षक कपड्यांची खरेदी करता येणार असल्याचा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.



















Join Our Whatsapp Group