पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर सोसायटी व ट्रायोस सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण काही कारणास्तव अनेक वर्ष रखडले होते. त्यामुळे सोसायटी मधील नागरिकांना पावसाळ्यात व इतरवेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे व नगरसेविका सौ. शितलताई काटे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे व संबंधित मनपा विभागाशी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या रस्त्याबाबत लवकर तोडगा काढण्यात यावा अशा सुचना केल्या होत्या. त्यानुसार आज या ट्रायोस व झुलेलाल टॅावर सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. नाना काटे व शितलताई काटे यांनी केलेल्या प्रयत्नाचे सोसायटी मधील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.