पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवार राहुल कलाटे काय भूमिका घेणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आज शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्याशी एक तास बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर राहुल कलाटे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
“राहुल कलाटे म्हणाले सचिन अहिर यांच्याशी माझी चर्चा झाली, त्यानंतर उद्धवजी ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. उद्धव ठाकरे यांचा कोणताही अनादर करण्याचा माझ्या मनात नाहीये. परंतु माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बोलतो. ज्यांनी मला आज पर्यंत पाठबळ दिले त्यांच्याशी सर्वांची चर्चा करतो आणि मगच कळवतो.”
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे सचिन अहिर यांच्या मनधरणीनंतर राहुल कलाटे त्यांच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून काय भूमिका घेणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. काही वेळातच कलाटे यांची भूमिका स्पष्ट होईल. मात्र त्यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.