पिंपरी (Pclive7.com):- दिवंगत लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदार संघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांचे नुकतेच दुःख निधन झालेला आहे. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहेत. राजसाहेब नेहमी सांगतात जेव्हा एखादा विद्यमान लोकप्रतिनिधी यांचे निधन होते, ती पोट निवडणूक बिनविरोध करावी, याच अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महेश लांडगे, एकनाथ पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, प्रभारी किशोर शिंदे, हे सर्व मनसे कार्यालय पिंपरी या ठिकाणी उपस्थित होते व चर्चा करून राजसाहेब यांच्या आदेशाने आज चिंचवड विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाला आज पाठिंबा देण्यात आला.
या निवडणुकीमध्ये सध्या तरी पक्षाचे कोणतेही कार्यकर्ते प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होणार नाहीत पुढील नियोजन राजसाहेब यांच्या आदेशाने केले.