पिंपळे सौदागर (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी ज्यांनी योगदान दिले, राज्याच्या जडणघडणीत ज्यांनी सहभाग घेतला, त्यांचा वारसा पुढे चालवण्याचे सामर्थ्य आपणा सर्वांना लाभो असे प्रतिपादन उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे यांनी केले. पिंपळे सौदागर येथील आनंद हास्य योगा क्लबच्यावतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कुणाल आयकॉन रोडवरील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय भिसे आणि कुंदाताई भिसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य लक्षात घेऊन शैलजा लोकरस, शोभा पोरवाल आणि आनंद हास्य योगा क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जैस्वाल यांनी मनोगत व्यक्त केले. कामगार दिनानिमित्त कुंजीर क्रिडांगणाची देखभाल करणारे कामगार अजय धायगुडे, सौरभ परघळे आणि गणेश यादव यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन भामिनी महाळे यांनी केले. यावेळी हास्य क्लबच्या सदस्यांनी सामुहिक स्वरुपात महाराष्ट्र गीत सादर करुन क्रिडांगणाच्या परिसरात शोभायात्रा काढली. शेवटी नीता गुप्ता यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल कुलकर्णी, संतोष वर्तक, विमल मोंढेकर, अशोक उगीले, शोभा राजगुरु, सुनीता जैस्वाल यांनी परिश्रम घेतले.