पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.

महापालिकेच्या वतीने दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, मात्र तो अपुरा व कमी दाबाने आहे. नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सोसायट्यांना खासगी टँकर मागवावे लागत आहे. लाखो रुपये कर भरूनही महापालिका दैनंदिन गरज असलेला पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात करू शकत नाही, त्वरित पुरेसा पाणीपुरवठा करा अन्यथा हंडा मोर्चा काढण्यात येईल अशा इशारा काटे यांनी दिला.






















Join Our Whatsapp Group