पिंपरी (Pclive7.com):- पुनावळे येथील ऑक्सीजन पार्क गार्डनमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. युवासेनेचे उपशहर प्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात विद्युत विभाग ड प्रभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी अंतर्गत गार्डनमध्ये आधीच काही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असले तरी ते अपुरे ठरत आहेत. गार्डन परिसरात मोठ्या आणि लहान झाडांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणी अंधाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गार्डनमध्ये अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Tags: Sagar Shinde





















Join Our Whatsapp Group