पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी येथील मनपा शाळा क्रमांक 89 मध्ये विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेट वाटप करण्यात आले.

निशा यादव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन सर तसेच इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहण्यासारखा होता. विद्यार्थ्यांच्या समाधानातच या उपक्रमाचे खरे यश दडले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजाशी नाळ अधिक दृढ होत असून, पुढील काळातही अशा सामाजिक कार्याची परंपरा अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




















Join Our Whatsapp Group