पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छतेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कचरा टाकणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत. ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव अंतर्गत प्रभाग क्र.२४ मध्ये सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली.

ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक स्नेहल सुकटे तसेच आरोग्य सहाय्यक प्रशांत गोठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत प्रशांत पवार व सुधीर वायदंडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत कारवाई अंमलात आणली.

महापालिकेच्या पथकाने संबंधित नागरिकांना दंडात्मक कारवाई करत स्वच्छतेबाबत सूचना दिल्या. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये व महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा व कारवाया पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.




















Join Our Whatsapp Group