पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील देवकर पार्क परिसरातील घरात गॅस गळतीमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.२७ नोव्हेंबर) सायंकाळी ५.५२ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत पियानो, कपडे, गॅस रेग्युलेटर आणि पंख्यासह काही साहित्य जळून खाक झाले. या घटनेत घरातील अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

या घटनेची माहिती राज भिंगारकर यांनी सायंकाळी ५.५२ वाजता अग्निशमन दलाला फोनद्वारे दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी येथील मुख्य अग्निशामक केंद्रातून तातडीने अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले.
घरात गॅस गळती झाल्याने आग लागली होती. आगीमध्ये पियानो, कपडे, गॅस रेग्युलेटर, पंखा आदी वस्तूंचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली.
या मोहिमेत स्टेशन ऑफिसर गौतम इंगवले, लीडिंग फायरमन विजय घुगे, वाहनचालक विनायक मोहरे, मिलिंद कवठे, ऋषिकेश खांडगे, दत्तात्रय जाधव, ऋषिकेश मोरे आणि स्नेहा आंबेकर या अग्निशमन जवानांनी सहभाग घेतला. गॅस गळतीमुळे लागलेल्या या आगीत आर्थिक नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत न झाल्याने मोठा अनर्थ टळला.


















Join Our Whatsapp Group