महात्मा फुले यांना अभिवादन करत काँग्रेसचा शिक्षण, समता आणि संविधानिक मूल्य रक्षणाचा सामूहिक संकल्प
पिंपरी (Pclive7.com):- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी चौक येथील मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
“महात्मा फुले यांनी शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, जातिभेद निर्मूलन आणि सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य कायम समाजाला दिशा देणारे आहे त्यांनी समाजातील वंचित, शोषित आणि बहुजन घटकांच्या हक्कांसाठी दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. महात्मा फुले विचारात इतिहासाप्रमाणेच वर्तमान बदलण्याची ताकद आहे ” असे मत यावेळी नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त आले.

कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक शपथ घेऊन जातिभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देण्याचा निर्धार केला. तसेच मुलींचे शिक्षण, महिला सक्षमीकरण, वंचित घटकांना न्याय आणि भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प सामूहिक प्रतिज्ञा घेत करण्यात आला.
या कार्यक्रमास शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश काँग्रेसचे मा.सरचिटणीस केदार पाटील साळुंखे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष कुणाल भोसले, हिराचंद जाधव, संदीप शिंदे, देवदत्त रानवडे, रामकिसन माने, मेहबूब इनामदार, नबीलाल मुल्ला, पुरुषोत्तम राऊत, मंगेश चव्हाण, रवींद्र कुंभार, रावसाहेब गंगाधरे, महबूब शेख, राजेश परदेशी, प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते.


















Join Our Whatsapp Group