पिंपरी (Pclive7.com):- परमपूज्य सद्गुरू साई वासंघोट साहेब यांच्या १३२ व्या वर्सी महोत्सवानिमित्त पिंपरीमध्ये बुधवार, २ डिसेंबर २०२६ रोजी भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने हरिनाम संकीर्तन, सत्संग, भजन आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जगदीश लालचंदानी यांनी दिली आहे.

या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध कथावाचिका आणि भजन गायिका देवी चित्रलेखाजी यांचे हरिनाम संकीर्तन. तसेच हजुरी रूप बाबा साई कलीराम साहेबजी आणि साई मनीराम साहेबजी यांच्या उपस्थितीत सत्संग व भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवारी (दि. २ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजल्यापासून या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा पिंपरीमधील वैभव नगर रोड येथील रॉयल वर्ल्ड स्कूल येथे पार पडणार आहे. या महोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन सत्संग, संकीर्तन आणि भक्तिरसाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण : रॉयल वर्ल्ड स्कूल, वैभव नगर रोड, पिंपरी, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८५००९११३७ / ९६६५४६०७९०.


















Join Our Whatsapp Group