पिंपरी (Pclive7.com):- वाकडमध्ये श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम नवमी निमित्त वाकड परिसरात भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पारंपारिक वेशभूषेत वाकड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
ही शोभायात्रा काळाखडक, चंद्र माऊली गार्डन, स्वामी विवेकानंद चौक, चौधरी पार्क, ओमेगा सोसायटी, कोस्टारिका सोसायटी, ज्ञानोबा चौक, माऊली चौक, उत्कर्ष चौक, वाकड चौक ते वाकड येथील हनुमान मंदिर या मार्गे पार पडली.
याप्रसंगी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई जगताप या उपस्थित होत्या. तसेच यावेळी युवानेते राम वाकडकर, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भारती विनोदे, गणेश कस्पटे, रणजीत कलाटे, अमोल कलाटे, श्रीनिवास कलाटे, विनोद कलाटे, सिद्धार्थ गायकवाड, सुरज भुजबळ, प्रमोद भुजबळ, सनी भुजबळ, रावसाहेब डोंगरे, सुरेश राजे तसेच वाकड गावातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.