वडगाव मावळ (Pclive7.com):- मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमूठ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर स्वबळावर निवडणूका लढवण्याच्या घोषणा करणाऱ्या भाजपला काँग्रेसचा टेकू घेऊन सर्वपक्षीय पॅनेलचा आधार घेण्याची वेळ आली आहे. भाजपा प्रणित सर्वपक्षीय पॅनलमध्ये उमेदवार उभे करुन राष्ट्रवादीला आव्हान दिल्याचे सध्यातरी दिसत आहे. मात्र काँग्रेसच्या एका गटाने भाजपशी हात मिळवणी केल्याने या निवडणुकीत काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपला एकटे लढणे सोपे नसल्याने त्यांनी सर्वपक्षीय पॅनलच्या आडुन राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत यशस्वी ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 18 जागांसाठी 40 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून भाजप-काँग्रेस-शिवसेना-आरपीआय यांचा छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनेल व राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-एसआरपी असा महाविकास आघाडीचा सहकार पॅनल यांच्यात सरळ लढत होत असून चार जण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्षीय सहकार परिवर्तन पॅनलचे उमेदवार..
सर्वसाधारण कृषी पतसंस्था शत्रुघ्न रामभाऊ धनवे, निलेश विष्णू मराठे, बंडू तुकाराम कदम, सुभाष रामभाऊ देशमुख, विशाल बबनराव भांगरे, प्रसाद प्रकाश हुलावळे, खंडू बाळाजी तिकोने, कृषि पतसंस्था महिला नंदा देवराम सातकर, कांचन सुभाष धामणकर, कृषि पतसंस्था ओबीसी एकनाथ नामदेव पोटफोडे, कृषि पतसंस्था भटक्या विमुक्त जमाती शरद परशुराम साळुंखे, ग्रामपंचायत सर्वसाधारण योगेश गजानन राक्षे, शिवराम मारुती शिंदे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल अस्लम जमिल शेख, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती अंकुश ज्ञानदेव सोनवणे, व्यापारी सर्वसाधारण प्रकाश रामचंद्र देशमुख, नामदेव ज्ञानेश्वर कोंडे, हमाल तोलारी सर्वसाधारण हनुमंत ईश्वर मराठे.
महाविकास आघाडी सहकार पॅनल..
सर्वसाधारण कृषि पतसंस्था दिलीप नामदेव ढोरे, संभाजी आनंदराव शिंदे, सुभाष रघुनाथ जाधव, विलास सदाशिव मालपोटे, बंडू दामू घोजगे, मारुती नाथा वाळुंज, साईनाथ दत्तात्रय मांडेकर, कृषि पतसंस्था महिला सुप्रिया अनिल मालपोटे, अंजली गोरख जांभुळकर, कृषि पतसंस्था ओबीसी शिवाजी चिंधु असवले, भटक्या विमुक्त जमाती विलास बबन पवार ग्रामपंचायत सर्वसाधारण-
नामदेव नानाभाऊ शेलार, विक्रम प्रकाश कलवडे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल अमोल अरुण मोकाशी, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती नथु शंकर वाघमारे, व्यापारी सर्वसाधारण भरत दशरथ टकले, महेंद्र छगनलाल ओसवाल, हमाल तोलारी-सर्वसाधारण शंकर अंतू वाजे. आणि अपक्ष म्हणून जितेंद्र परदेशी, नवनाथ हरपुडे, परशुराम मालपोटे, सुनील दाभाडे आदि. निवडणुक रिंगणात आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शिवाजी घुले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्रकुमार नेहुल, जितेंद्र विटकर, गंगाधर कोतावार, राकेश निखारे आदी निवडणूक कामकाज पाहत आहेत.